Home > Work > The Immortals of Meluha (Shiva Trilogy, #1)

The Immortals of Meluha (Shiva Trilogy, #1) QUOTES

132 " एखाद्या यशस्वी समाजाला काय हवं असत? हे नीळकंठा, अशा समाजाला स्थैर्य आणि लवचिकता या दोन्ही गोष्टी हव्या असतात. तुम्हाला लवचिकता कशासाठी हवी असते? कारण प्रत्येक व्यक्तीची वेगवेगळी स्वप्नं असतात आणि प्रत्येकाकडे वेगवेगळ्या क्षमता असतात. एखाद्या लढवय्यानं जन्म दिलेल्या त्याच्या स्वतःच्या मुलाकडे कदाचित व्यापारासाठी आवश्यक असलेले गुणधर्म असतील. अशा वेळी आपल्या वडलांचा व्यवसाय सोडून देऊन आपल्या क्षमतेनुसार योग्य व्यवसाय निवडू देण्याचं स्वातंत्र्य त्या मुलाला देण्याएवढा तो समाज लवचीक असला पाहिजे. समाजातील लवचिकतेमुळे बदल घडू शकतो. त्यामुळे समाजातील सर्वच लोकांना आपापल्या अस्तित्वाचा वेध घेता येतो. त्यांनाही मोकळेपणानं श्वास घेण्यास जागा मिळते. आपल्या क्षमतेचा विकास करून घेता येतो. जर समाजातील प्रत्येक व्यक्तीला तिच्या क्षमतेचा योग्य विकास करून घेता आला, तर तो संपूर्ण समाज आपल्या खऱ्या क्षमतेपर्यंत पोहचतो. "

Amish Tripathi , The Immortals of Meluha (Shiva Trilogy, #1)